मुक्ताईनगर मतदारसंघाला मिळणार भरीव निधी : आ. पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज मतदारसंघातील विकासकामांना भरीव निधी मिळावा यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघासाठी मोठा निधी मिळाला आहे. आता मतदार संघातील मागासवर्गीय वस्त्यांसाठी भरिव निधी मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या अनुषंगाने आज आ.चंद्रकांत पाटील यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे मुक्ताईनगर मतदार संघातील विविध गावांमध्ये मागासवर्गीय (दलीत) वस्ती अंतर्गत सामाजिक न्याय विभागातर्फे विविध विकास कामे करण्यासाठी भरीव निधीची मागणी असलेले पत्र देवून विकास कामे मंजूर करून निधीसाठी सविस्तर चर्चा केली.

याप्रसंगी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दाखवून तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या यामुळे आता मुक्ताईनगर मतदार संघातील दलीत वस्ती अंतर्गत बहु प्रतीक्षेत असलेल्या विविध विकास कामांना चालना मिळणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाचे नवीन पर्व सुरू होणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी सांगितले.

Protected Content