पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा फडणवीस यांना विश्वास

Devendra Fadnavis 1

मुंबई वृत्तसंस्था । महाराष्ट्रात निवडणुकीचं बिगुल वाजताच राजकीय पक्ष आपापल्या विजयाचे दावे करू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मी पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप १६२ जागा जिंकू शकते. मात्र आपल्या लहान मित्रपक्षांनाही भाजप जागा देणार आहे. एकीकडे भाजपने सत्तेचा दावा केला असून आतापर्यंत शिवसेना महाराष्ट्रात भाजपसोबत समान जागांवर लढण्यावर अडून होती. पण आता १२६ जागांवर राजी होताना दिसत आहे. मात्र युतीबाबतच्या तर्कवितर्कांना आलेल्या उधाणाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी भाजप-शिवसेना निश्चितपणे एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले.

Protected Content