यावल येथे उद्या मुशायऱ्याचे आयोजन

शेअर करा !

yaval 2

यावल प्रतिनिधी । येथील खान्देशच्या मातीत जन्मलेले ऊर्दुचे प्रसिध्द शायर (कवी) मुकीम असर ब्यावली यांच्या स्मरणार्थ उद्या (दि.22) रात्री 8 वाजता मुशायऱ्याचे आयोजन सुदर्शन चित्र मंदिर परिसरातील हाजी मुस्तफा शेठ व्यापारी संकुलनाच्या सभागृहात करण्यात आले आहे.

store advt

याबाबत अधिक माहिती अशी की, या मुशायऱ्यात सहभाग घेण्यासाठी भारताचे प्रसिद्ध शायर नईम अख्तर खादमी, अजीम रामपुरी, रईस फैजपुरी, शकील हसरत, इमरान फारीस, रागीब ब्यावली, शहीद मुफर, साबीर आफाक, नौशाद व्यावली, अशपाक निजामी, अफजल दानिश, एम. तबरेज, एहेजाद ब्यावली, खादीमे रसुल, डॉ. शकील सईद, अहद अमजद यांच्यासह आदी प्रसिध्द शायर उपस्थितीत राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक रशीद मनीयार ठेकेदार, अब्दुल करीम मनीयार, असलम फर्निचर, युवा सामाजिक कार्यकर्ता अल्ताफ शेख समद, युसुफ ठेकेदार झेंडेवाले यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!