महापालिकेची अनधिकृत गाळ्यांवर कारवाई (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 21 at 6.05.20 PM

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील महात्मा ज्योतिराव फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील ८ अनधिकृत गाळ्यांवर आज कारवाई करण्यात आली. दुकानातील मालासकट गाळे पंचनामा करून सिल करण्यात आले. तसेच मार्केटमधील बंद शौचालयातील ठेवलेले सामान जप्त करून ते खुले करण्यात आले. तर फुले मार्केटमधील कबुतर खाना दुकानांच्या लाईनमध्ये वरच्या मजल्यावरील दुकानांबाहेरील जागेत औषधी विक्रेत्याने अनधिकृत बांधकाम करून त्याचा वापर करत असल्याचे अढळून आले.

महापालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्या आदेशाना आज उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा ज्योतिराव फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्यात आली. फुले मार्केट मधील काही व्यापाऱ्यांनी मिटर रुम, जिन्या खालील जागेत पक्के बांधकाम करुन अनधिकृतपणे गाळे तयार केले असून त्यांचा व्यवसायीक वापर केला जात असल्याचे अढळून आले होते. त्यानुसार आज सकाळी अकरा वाजता ही कारवाई सुरू करू करण्यात आले. यावेळी अतिक्रमण निर्मूलन विभाग अधिक्षक एच. एम. खान, किरकोळ वसुली विभाग प्रमुख नरेंद्र चौधरी यांच्यासह संजय ठाकुर आदी दोन्ही विभागाचे २५ कर्मचारी तर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी होते.

… आणि नगरसेवक भंगाळे यांची धाव
महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केटमधील मीटर रुम व जिन्याच्या जागेचा वापर दुकानांसाठी केला जात असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार जिन्याखाली उभारण्यात आलेले गाळे व मीटर रुमचा दुकानासाठी वापर करणाऱ्या गाळे सिल केले. दुकानातील मालासकट गाळे पंचनामा करून सिल करण्याची प्रक्रिया केली. फुले मार्केटमधील दाणाबाजाराच्या बाजूने कबुतरखाना गल्लीत वरच्या मजल्यावर झवर ब्रदर्स नावाचे औषधीचे दुकान आहे. पाहणी दरम्यान उपायुक्त डॉ. गुटे यांना दिलेल्या जागे वेतरीक्त पोर्चमध्ये बांधकाम करून औषधीचे दुकान थाटल्याचे अढळून आले. तसेच वर पून्हा शेड उभारून तेथे सामान ठेवल्याचे अढळून आले. यावेळी दुकान योगेश व अनुप झवर यांची उपायुक्तांशी शाब्दीक वाद झाला. उपायुक्तांनी त्वरीत ही जागा सिल करण्याचे आदेश दिलेत. यावेळी औषधी दुकानदार व उपायुक्तांमध्ये शाब्दिक वाद उडाला. उपायुक्तांनी दुकानदाराकडून कागदपत्रे मागितले असता दुकानदाराला ठोस कागदपत्रे सादर करण्यात सांगितले असता तो ती सादर करू शकला नाही. दुकानांत कारवाईची माहिती नगरसेवक विष्णू भंगाळे यांना मिळताच त्यांनी मार्केटमध्ये धाव घेतली. यावेळी उपयुक्त गुटे यांनी दुकानातील औषधीचे सामान काढू द्यावे त्यानंतर नियमानुसार सिल करावे अशी मागणी उपायुक्तांकडे केली. यावेळी दरवाजा बसवून त्यावर सिल करण्यापर्यंत सामान काढण्याच्या सुचना यावेळी दिल्या.

शौचालयांचे बनविले गोडावून
फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील महिला व पुरुषांसाठी बांधण्यात आलेले शौचालयांचा रुपांतर गोडाऊनमध्ये करण्यात आले होते. तसेच सेंट्रल फुले मार्केमधील एका इलक्‍ट्रीकच्या दुकानाजवळील कुलूप लावून बंद केलेल्या शौचालयाचे कुलुप तोडले असता शौचालयात इलेक्‍ट्रीक वस्तूचे गोडावून अढळून आले. सर्व सामान जप्त करून ही शौचालये नागरिकांसाठी खुली करण्यात आली. दरम्यान वाद होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. यावेळी सिल केलेल्या गाळ्यावर नोटीसा लावून पंचासमोर पंचनामा करून व्हिडीओ चित्रिकरण करून ही कारवाई केली.

Protected Content