शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांच्याकडे रावेर पंचायत समितीचा पदभार

रावेर प्रतिनिधी । येथील पंचायत समिती सभापतीपदाची प्रभार जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी स्वीकारला आहे.

येथील पंचायत समिती सभापती जितू पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर निवड होईपर्यंत, जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती रवींद्र पाटील यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. त्यांनी रावेर पं.स. सभापतीपदाचा पदभार स्वीकारला.

रावेर पंचायत समिती सभापती पदाची निवड १५ फेब्रुवारीला होणार आहे. तोपर्यंत सभापती रवींद्र पाटील यांची नियुक्ती जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील यांनी केली आहे. या अनुषंगाने त्यांनी या पदाचा कार्यभार सांभाळला. याप्रसंगी मावळते सभापती जितू पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, सरचिटणीस सी.एस.पाटील, जि.प.सदस्य कैलास सरोदे, शिक्षणाधिकारी एस.डी.दखणे, शालेय पोषण आहार अधीक्षक अजीत तडवी, दिलीप पाटील यांनी स्वागत केले.

Protected Content