सुप्रीम कॉलनीवासियांना मिळणार वाघूरचे पाणी !

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रिम कॉलनीवासीयांना अमृत योजनेच्या अंतर्गत शहरात सर्वप्रथम पाणी मिळणार असून यामुळे या भागातील नागरिकांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीची पूर्तता होणार आहे.

सुप्रीम कॉलनी व परिसरात आजवर कधीही नियमीत पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र अद्याप या भागात वाघूरचे पाणी पोहचले नव्हते. तथापि, आता अमृत योजनेंतर्गत परिसरासाठी नव्याने यंत्रणा बसवण्यात आली आहे. पाणी साठवण टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. अमृतची जलवाहिनी वाघूरच्या जलवाहिनीला जोडण्यासाठी एक व्हॉल्व्ह बसवण्यात आला असून वाघूरच्या मुख्य वाहिनीला जोडणी करण्यास आजपासून प्रारंभ होणार आहे.

दोन दिवसात जोडणी करून शनिवारी चाचणी घेतली जाणार आहे. दरम्यान, बुधवारी महापौर भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी केली. या वेळी नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, प्रवीण कोल्हे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत भापसे, भूषण जाधव, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले, पाणीपुरवठा अभियंता सुशील साळुंखे, प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, शाखा अभियांता शामकांत भांडारकर, मक्तेदार प्रतिनिधी पंकज बर्‍हाटे आदी उपस्थित होते.

Protected Content