उद्या भाजप जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडीसाठी बैठकीचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणची जिल्हाध्यक्ष निवड उद्या शुक्रवार दि.१० जानेवारी रोजी सकाळी ११.०० वा संत हरदास राम मंगल कार्यालय,सिंधी कॉलनी येथे जिल्हा निवडणूक अधिकारी रावसाहेब दानवे-पाटील, माजी मंत्री आ.गिरीष महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.

भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणची जिल्हाध्यक्ष निवड बैठकीला विभाग संघटन मंत्री अॅड. किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, खा.रक्षा खडसे, खा.उन्मेष पाटील,प्रदेश चिटणीस आ.स्मिता वाघ, आ.संजय सावकारे, आ.राजुमामा भोळे, आ.चंदूभाई पटेल, आ. मंगेश चव्हाण, ना.हरिभाऊ जावळे, जि.प.अध्यक्ष ना.रंजना पाटील, जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, ना. गुरुमुख जगवानी,बेटी बचाव बेटी पाढाव राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर उपस्थित राहणार आहेत. याबैठकीस जिल्हापदाधिकारी व कार्यकारणी, मंडल कार्यकारणी ,जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष -नगरसेवक व सर्व सक्रीय सदस्य यांनी बैठीस उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे, सरचिटणीस पोपटतात्या भोळे, सदाशिवआबा पाटील, अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, हर्षल पाटील, प्रभाकर पवार यांनी केले आहे.

Protected Content