Home Cities जळगाव जळगावात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट खंडपीठ स्थापन करण्याची मागणी 

जळगावात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट खंडपीठ स्थापन करण्याची मागणी 

0
13

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांच्या सोयीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट खंडपीठ जळगाव येथे स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी जळगाव उत्तर महाराष्ट्र मुंबई उच्च न्यायालय सर्किट खंडपीठ कृती व संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले. या मागणीसाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक वकील बांधव उपस्थित होते.

निवेदन देण्यापूर्वी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकांना अभिवादन करून पूजन केले. त्यानंतर सर्किट खंडपीठ जळगाव येथे स्थापन करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सादर करण्यात आले. उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी मुंबई किंवा अन्य ठिकाणी जावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. जळगाव येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट खंडपीठ स्थापन झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी अधिक सोयीचे ठिकाण उपलब्ध होईल. तसेच वेळ आणि आर्थिक खर्चाची बचत होण्यास मदत होईल, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

जळगाव हे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असून, या परिसरातील नागरिकांना न्यायालयीन सुविधा अधिक सुलभ व्हाव्यात, यासाठी सर्किट खंडपीठाची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी समितीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष ॲड. संजयसिंग पाटील, जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. राजेश गवई, माजी अध्यक्ष ॲड. सागर चित्रे, ॲड. संजय सपकाळे, ॲड. विजय शर्मा यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते. सर्किट खंडपीठाच्या मागणीसाठी पुढील काळातही पाठपुरावा सुरू ठेवण्याची भूमिका समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound