पंटरांवर कारवाई, मात्र सट्टा सम्राटांना अभय : मुक्ताईनगरातला प्रकार

मुक्ताईनगर प्रतिनिधी | शहरात राजरोजसपणे सुरू असलेल्या सट्टयाबाबत प्रसारमाध्यमांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर यावर थातूर-मातूर कारवाई करून पंटरांवर गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी यातील म्होरक्यांना अभय देण्यात आले आहे. यामुळे पोलिसांनी समूळ कारवाई करण्याची अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात वृत्त असे की, शहरात उघडपणे सुरू असलेल्या सट्टयाबाबत स्थानिक प्रसारमाध्यमांनी वार्तांकन केल्यामुळे पोलीस प्रशासनाने कारवाई केली आहे. शहरातील परिवर्तन चौकात जवळील असलेल्या काही हात गाडमध्ये सट्टा मटका खुलेआम चालत होता परंतु एलसीबी पथकाने येऊन दोन सट्टा मटका घेणारे यांना ताब्यात घेऊन कारवाई केली व त्याच अनुषंगाने मुक्ताईनगर येथील स्थानिक पोलिस प्रशासन यांनी सुद्धा दोन जणांवर कारवाई केली. यामध्ये चार जण सट्टा घेणारे व दोन मालक अथवा चालक अशा एकूण सहा जनावर कारवाई मुंबई जुगार क्ट १२ अ प्रमाणे १६ डिसेंम्बर २०२१ रोजी सकाळी कारवाई करण्यात आली. परंतु लागलीच दुसर्‍या दिवशी खत्री गल्लीत पुन्हा जैसे थे चालू आहे नेमकी कारवाई कशासाठी करण्यात आली असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे

मुक्ताईनगर शहरामध्ये अशा किरकोळ कारवाई भरपूर प्रमाणात होत असतात. परंतु मोठ्या माशाला का सोडले जाते कारवाई झाल्यानंतर सुद्धा सट्टा खेळला जात आहे. यामुळे नेमकी कारवाई कुठल्या स्वरूपात झालेली आहे याचे सुध्दा नागरिकांना कोडे पडत आहे. पोलीस प्रशासनाने तर अश्या प्रकारची सूट दिली नाही ना ? कारवाई झाल्यावर लगेच जर मटका हा चालू होतं आहे तर कारवाई करण्यातच काय अर्थ आहे ? असे प्रश्‍न आता विचारण्यात येत आहे.

पोलीस प्रशासनाने सुरू केलेली कारवाई ही अतिशय स्वागतार्ह अशीच आहे. मात्र या कारवाईत सातत्याची आवश्यकता आहे. तसेच यात कुणालाही अभय देता कामा नये अशी मागणी आता होत आहे.

Protected Content