तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (वय-२२) रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात असलेल्या रामदेव बाबा मंदिर परिसरात हद्दपार असलेला गुन्हेगार दिनकर चव्हाण हा हातात तलवार घेऊन दहशत माजावीत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलीस कर्मचारी यांनी मंगळवार १४ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता संशयित आरोपी दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण याला अटक केली. त्याच्याकडून तलवार पोलिसांनी हस्तगत केली आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील, नाना तायडे यांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिव्य करीत आहे.

Protected Content