नागरिकांच्या संतापाचा उद्रेक : महापालिका आवारात कचरा टाकून व्यक्त केला रोष (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  शिवाजीनगर हुडको भागातील नागरिक मागील ५ वर्षांपासून विविध नागरी समस्यांनी त्रस्त असून या त्रस्त नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात कचरा टाकून आपला संताप व्यक्त केला. येत्या १० दिवसात समस्या सोडल्या नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.

 

जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको भागातील नागरिक विविध  नागरी समस्यांनी मागील ५ वर्षांपासून त्रस्त झाले आहेत. या समस्या त्वरित सोडविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महापालिकेवर रस्ते अस्थापना जिहा संघटक राजेंद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली  टाॅवर चौक येथून मोर्चा काढून समारोप महापालिकेत करण्यात आला. यावेळ संतप्त नागरिकांनी आपल्या सोबत आणलेला कचरा महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात टाकून मनपा प्रशासनाचा निषेध केला. यानंतर आयुक्त विद्या गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की,  शिवाजी नगर भागातील हुडको हा परिसर अनेक समस्यांच्या विळख्यात अडकला आहे.   या परिसरातील स्थानिक नगरसेवक अथवा मनपाकडून या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. या भागात स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाही. येथे गटारींची  साफसफाई नियमित साफसफाई होत नसल्याने ती तुडुंब भरून त्याचे घाण पाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात आजपर्यंत रस्ते तयार करण्यात आलेले नाहीते. हे र रस्ते लवकरात लवकर करण्यात यावेत. या भागामधील  सार्वजनिक  शौचालयाच्या चेंबर्सची नियमित साफसफाई करण्यात यावी.  या समस्या  १० दिवसांचे आत सोडविल्या गेल्या  नाहीत तर मनसे व शिवाजी नगर हुडको परिसरातील त्रस्त नागरिक मनपा समोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा संघटक राजेंद्र  निकम, मनसे महानगर अध्यक्ष विनोद शिंदे,  उपशहर अध्यक्ष आशिष सपकाळे,  प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळे,  योगेश पाटील,  बंटी शर्मा,  महेंद्र सपकाळे, महेश माळी, विकास पाथरे, विशाल कुमावत, गोविंद जाधव, संतोष सुरवाडे, मनोज खुडे, नूतन शिंपी,  निलेश खैरनार, अविनाश जोशी, सागर पाटील, आशुतोष जाधव, गणेश नेरकर, भिकन शिंपी आदी मोर्च्यात सहभागी झाले होते.

 

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/356663049867857

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/639571434477643

Protected Content