शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती संभाजीराजे येणार रायगडावर

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेच्या उमेदवारीच्या राजकीय नाट्यानंतर शिवराज्याभिषेक कार्यक्रम सोहळ्यासाठी  छत्रपती संभाजीराजे हे देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते मौन सोडणार कि आगामी काळात कोणती भूमिका घेतात याविषयी उत्सुकता आहे.

रायगडावर ६ जून रोजी शिवराज्याभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रम सोहळ्यासाठी स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे हे देखील उपस्थित राहणार आहेत. राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने पाठींबा द्यावा अशी मागणी शिवसेनेकडे केली होती. परंतु त्यांना पाठींबा मिळाला नसल्याचे राजकीय नाट्य घडले होते. त्यानंतर श्रीमंत शाहू महाराज यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली होती.  दरम्यान मौन कायम असले तरी छत्रपती संभाजीराजे प्रथमच ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी रायगडावर येणार आहेत.

दरम्यान, शिवसेनचे खा. तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी शाहू महाराजांची भेट घेतली होती. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर ते  स्वराज्य पक्ष विस्तार वाढीच्या अनुषंगाने पुढची राजकीय दिशा स्पष्ट करण्यासह मराठा आरक्षण लढा पुन्हा उभारणार यासंदर्भात काही घोषणा केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content