ऑफीसचे साहित्य मागण्यावरून महिलेला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऑफीसचे साहित्‍य मागितल्याच्या कारणावरून एका महिलेला शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली तर एकाने डोक्यावर काठी टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा येथे घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १४ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मनिषा दिनेश गवळे वय ३१ रा. जय भवानी नगर, मेहरूण, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे पती दिनेश गवळे हे दिपाली सुरवाडे यांच्यासोबत भाड्याने ऑफीस घेवून काम करीत असतांना ऑफीसचे काही साहित्य दिपाली सुरवाडे ह्या घरी घेवून गेल्या. त्यानंतर त्यावेळी मनिषा गवळे यांनी ऑफीसचे साहित्य दिपाली यांच्याकडे मागितले. या कारणावरून रविवारी १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता दिपाली बाळू सुरवाडे, बाळू सुका सुरवाडे, बेबीबाई बाळू सुरवाडे, सोनु शिवराम तायडे, राजेश बाळू सुरवाडे, चैताली अनिल बाविस्कर सर्व रा. मन्यारखेडा जि.जळगाव यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली, त्यानंतर यातील बेबीबाई सुरवाडे हिने लाकडी काठी डोक्यात टाकून मनिषा गवळे यांना गंभीर जखमी केले.

जखमी अवस्थेत मनिषा गवळे यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत मंगळवारी १४ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात मारहाण करणारे दिपाली बाळू सुरवाडे, बाळू सुका सुरवाडे, बेबीबाई बाळू सुरवाडे, सोनु शिवराम तायडे, राजेश बाळू सुरवाडे, चैताली अनिल बाविस्कर सर्व रा. मन्यारखेडा जि.जळगाव यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हरेष पाटील हे करीत आहे.

Protected Content