रायपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रकाश पाटील

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रायपूर येथील ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीत आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या समर्थक व मार्गदर्शकत्वाखाली हेमराज पंडीत पाटील यांच्या नेतृत्वात आणि पॅनल प्रमुख माजी सरपंच रुपेश युवराज पाटील यांच्या सहकार्याने पार पडलेल्या निवडणुकीत प्रकाश लक्ष्मण पाटील (बापु दादा) यांची सरपंचपदी एकमताने निवड करण्यात आली.

ग्रामपंचायत सदस्य म्हणून लताबाई दिलीप भोई, मंदाबाई विश्वनाथ तायडे, अनिल कडू तायडे आणि संगीता निवृत्ती पाटील यांनी एकत्र येत एकसंघ भूमिका घेतली. त्यांच्याच वतीने प्रकाश पाटील यांचे नाव पुढे करण्यात आले आणि कोणतीही स्पर्धा न होता त्यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाली.

या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण असून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायत पॅनलने व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल ग्रामस्थांनी नव्याने सरपंचपद स्वीकारणाऱ्या प्रकाश पाटील यांचे हार्दिक अभिनंदन करत त्यांच्याकडून गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Protected Content