पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोक दर्पण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार यांनी सकल मराठा समाज यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत आपले योगदान तसेच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची धडपड व उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना नुकताच शाहू मराठा गौरव सन्मान पुरस्कार देण्यात आला.
मासिक शाहू मराठाचे संपादक प्रशांत गायकवाड व सकल मराठा समाज धुळे जिल्हा चिटणीस निंबा मराठे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी निंबा मराठे यांनी ज्येष्ठ पत्रकार भूपेंद्र मराठे यांचे पारोळा तालुक्यातील कार्य याबद्दल कौतुक करत येणाऱ्या काळात सकल मराठा समाजाला आपण मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर प्रशांत गायकवाड यांनी त्यांचे वृत्तपत्रातील लेखन समाजाला दिशा देणारे असून त्यांच्या पत्रकारितेचा फायदा सकल मराठा समाजाला प्रगतीच्या दिशेने असेल त्यामुळे श्री मराठे यांनी समाजकार्यासाठी आपले योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.दरम्यान हा सन्मान माझा नसून पारोळा शहरातील सकल मराठा समाजाच्या पंच मंडळी व नागरिकांचा आहे. मिळालेला सन्मानाने जबाबदारी वाढली असून समाजासाठी आपण नेहमी कटिबद्ध राहणार असल्याचे यावेळी ज्येष्ठ पत्रकार भूपेंद्र मराठे म्हणाले. शेवटी आभार कै डॉ.आशाताई फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रतीक मराठे यांनी मानले.