जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बाल साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी विवेकानंद प्रतिष्ठान प्रतिवर्षी खान्देशस्तरीय कुमार साहित्य संमेलन आयोजित करत असते, सोमवारी १६ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता डॉ.अविनाश आचार्य विद्यालयातून ग्रंथदिंडीने या संमेलनाची सुरुवात झाली. सुरुवातीला ग्रंथदिंडीचे पूजन विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, उपाध्यक्ष हेमा अमळकर, सचिव विनोद पाटील, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू यांच्याहस्ते करण्यात आले.
ग्रंथ दिंडीमध्ये विविध शाळेतील विद्यार्थिनींच्या लेझीम पथक ढोल पथक तसेच वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही ग्रंथ दिंडी सुयोग कॉलनी साने गुरुजी कॉलनी मार्गाने मायादेवी नगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगरी रोटरी भवन इथे सांगता करण्यात आली यानंतर उद्घाटन सत्रात मुख्य संपादक शुभदा चौकर, संमेलनाच्या अध्यक्षा पवनीकर, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, उपाध्यक्ष हेमाताई अमळकर, सचिव विनोद पाटील यांच्याहस्ते दीप प्रज्वलाने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक संमेलनाचे स्वागत अध्यक्ष स्वरांगी कुलकर्णी तर आभार प्रदर्शन प्रमुख पाहुण्यांचा परिचय संमेलनाचे पियुष बालाजी वाले यांनी करून दिला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात संमेलनाच्या अध्यक्षा संस्कृती पवनीकर यांनी कुमारांच्या वाढत्या मोबाईलच्या वापराबद्दल चिंता व्यक्त करीत कुमारांनी वाचनाकडे वळावे, जास्तीत जास्त वाचन लेखन करीत वाचन चळवळ वृद्धिंगत करावी, असे आवाहन केले. तसेच खान्देशस्तरीय कुमार साहित्य संमेलनाप्रमाणे अशी संमेलन व्हावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. संमेलनाच्या प्रमुख अतिथी यांनी अशा संमेलनाची ठिकठिकाणी गरजअसल्याचे सांगून गेल्या. सात वर्षापासून विवेकानंद प्रतिष्ठानचे अभिनंदन केले. संमेलनस्थळी विविध प्रकाशन संस्थांकडून पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. कुमारांनी या पुस्तक प्रदर्शनाला भेट देऊन विविध पुस्तकं चाळली, उद्घाटन नंतर सहभागी कुमार साहित्यिकांनी आपल्या कवितांचे वाचन केले. दिवसभरात दोन सभागृहांमध्ये विविध परिसंवाद कथाकथन तसेच प्रमुख अतिथी शुभदा चौकर यांची प्रतिभेच्या प्रांतातील प्रवास प्रकट मुलाखत होणार आहे. दिवसभरातील सर्वसत्रांत जळगावकर कुमार व त्यांच्या पाल्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन विवेकानंद प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.