रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर केलेल्या अत्याचारातून तिने एका मुलाला जन्म दिल्याचा धक्कादायक घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. गावात राहणारा संशयित आरोपी करण प्रकाश भिल वय २१ रा. बिलवाडी ता.रावेर याने पिडीत मुलीला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना १ डिसेंबर २०२३ घडली होती. तेव्हापासून पीडीत मुलगी ही अल्पवयीन असतांना देखील तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी ही गर्भवती राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. हि घटना उघडकीला आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी निंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी करण प्रकाश भिल वय २१ रा. बिलवाडी ता.रावेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीदास बोचरे हे करीत आहे.