महामार्गावर वृक्षलागवडीस टाळाटाळ करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी

umesh nemade and nitin gadkari

भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुच्या वृक्षांची कत्तल करून नवीन वृक्षलागवड करण्यास कंत्राटदार उदासिन आहे. अश्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केंद्रीय परीवहन व रस्ते बांधकाम मंत्री ना. नितीन गडकरी यांना निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांच्या रूंदीकरणासाठी पाच वर्षांपुर्वी डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. परंतु वृक्षांच्या कत्तली नतंर कॉन्ट्रॅक्टरने रस्ता रुदीकरणाचे काम सुरु करतांना नविन रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड करण्यात आलेली नाही. एकीकडे वृक्षलागवडीसाठी देशात मोठी जनजागृती केली जात आहे. मात्र रस्त्याच्या रूंदीकरणानंतर कंत्राटदाराला नवीन वृक्ष लागवडीसाठी सक्तीची असतांना याबाबत अनास्था दिसून येत आहे. पाच वर्षांपुर्वी ही झाडे लावली असती तर ते आज किमान दहा फुट उंचीचे राहिले असते. मात्र असे न करता जनसामान्यांच्या पर्यावरणाच्या मुद्याकडे हेतु पुरस्कर दुर्लक्ष केले आहे. या प्रकरणी संबधीत कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी परीवहन व रस्ते बांधकाम मंत्री ना. नितीन गडकरी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Protected Content