धरणगाव येथे तलावात पाणी साठ्ण्यासाठी नाला निर्मितीचा आदर्श उपक्रम

9eeb6df3 8737 4954 a9b0 f74b2467fae3

धरणगाव, प्रतिनिधी | येथील माळी वाडा परिसरातील फुलमाळी तलावात पाणी साठ्ण्यासाठी नाला तयार करून पाणी थेट तलावात जाईल, असा आदर्श उपक्रम महेंद्र महाजन यांनी स्वखर्चाने मित्र परिवाराच्या सहकार्याने हाती घेतला आहे.

 

या कामाचा शुभारंभ नुकताच युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश वाघ याचा हस्ते पूजन करून करण्यात आला. या कामासाठी महेंद्र महाजन, सुभाष महाजन, नितेश महाजन, योगेश बिऱ्हाडे, राहुल रोकडे, विशाल चौधरी, राहुल वाघ वभाऊसाहेब महाजन यांनी सहभाग घेतला.

Protected Content