चाळीसगावात ‘स्वयंदीप’ संस्थेत वृक्षारोपण (व्हिडीओ)

37dacd83 d6ab 4a75 99b3 66fa3e456bc2

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील ‘रहा अपडेट’ व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सुरु असलेल्या वृक्षारोपण मोहिमेत आज (दि. २१ जुलै) मिनाक्षीताई निकम यांनी स्थापन केलेल्या अपंग भगिनींसाठी काम करणाऱ्या स्वयंदीप या संस्थेत आज ३४ झाडांची लागवड करून त्यांना जाळ्या लावण्यात आल्या आहेत.

 

येथे पहिल्या टप्प्यात येथे ३४ झाडे लावण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात लवकरच ३८ झाडांची लागवड येथे केली जाणार आहे. विशेष म्हणजे वर्धमान धाडीवाल यांनी या झाडांना संरक्षण म्हणून जाळ्या दिल्या आहेत. त्यांनी या झाडांना व्यवस्थित वेळेवर पाणी मिळावे, यासाठी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याचीही व्यवस्था केली आहे. यावेळी ग्रुपच्या सदस्यांसह, जलमित्र, काही भगिनी व बालगोपालही मोठ्या हौसेने सहभागी झाले होते. या मोहिमेत आज सहभागी झालेल्या सदस्यांमध्ये वर्धमान धाडीवाल, दिलीप घोरपडे, मुराद पटेल, लक्ष्मण शिरसाठ, गणेश गवळी, रामलाल मिस्तरी, कुमारी भक्ती मिस्तरी, गजानन महाजन, विशाल पाटील, प्रताप देशमुख, रवींद्र सूर्यवंशी, योगेश शेळके, शरद पाटील, पूजा लद्दे, ज्योत्स्ना पाटील, नितीन पाटील, भाऊसाहेब पाटील, कुणाल पाटील, महेश येवले, सचिन स्वार, मोहन देशमुख, किरण शेळके, पिनू राजपूत, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, रवींद्र राजपूत, धनंजय अहिरे, हेमंत मालपुरे व प्रशांत अमृतकार आदी उपस्थित होते.

 

 

Protected Content