रस्ते विकासामुळे मतदारसंघाचा विकास : ना. गुलाबराव पाटील

8f665636 b2c0 4c33 b7aa 1d6177712f70

धरणगाव (प्रतिनिधी) रस्ते हे विकासाचे माध्यम असून प्रत्येक गावाच्या मूलभूत व पायाभूत सुविधेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. शासनाच्या विविध योजना केला असून यापुढेही शेतकरी व ग्रामस्थांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहील. राज्यमंत्री पदाचा उपयोग करून मतदारसंघात जास्तीत जास्त विकास करण्यासाठी करोडो चा निधी आणला.असून रस्ते विकासामुळे मतदारसंघाचा विकास शक्य होतो असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी धानोरा येथे रस्ते व विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ हे होते.

 

ना .पाटील यांना खंबीर साथ द्या : जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ

 

यावेळी जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्र्यापेक्षाही सर्वच स्तरावर मतदारसंघात कामे करून दळण -वळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावले आहे. गुलाबराव पाटील यांना राज्यमंत्री वरून कॅबिनेट मंत्री पदी बढती करण्यासाठी गुलाबराव पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे साथ देण्याचे आवाहान केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला ना.गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 

ना. पाटील यांचा भव्य सत्कार

प्रत्येक गावात ना गुलाबराव पाटील व मान्यवरांची ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत धानोरा येथे परिसरातील सर्व सरपंच ,पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थांनी विकासाचे महामेरू राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल श्रीफळं व गुलाबाचा हार घालून सत्कार केला. जय भवानी – जय शिवराय च्या घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.

 

व्यासपीठावर उप जिल्हा प्रमुख पी.एम.पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, तालुका प्रमुख गजानन पाटील, प्र. नगराध्यक्ष वासुदेव चौधरी,जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, अनिल पाटील, पंचायत समिती सदस्य प्रेमराज पाटील, मुकुंदराव नांनवरे, माजी सभापती डी.ओ .पाटील,मा.उपाध्यक्ष जानकीराम पाटील, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक विलास महाज, संजय चौधरी ,भागवत चौधरी, मोहन महाजन, सा.बा. चे उपअभियंता महेश ठाकूर, लांडगे, मोतीआप्पा पाटील, कैलास पाटील, धनराज पाटील,व चर्मकार समाजाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे ,दीपक सोनवणे, आसाराम कोळी , जिजाबराव पाटील,संजय ठाकरे,आर व्ही पाटील ,नाना ठाकरे, दीपक महाराज ,मुरलीअण्णा पाटील,दामू अण्णा, भदाणेगुरुजी, भाऊसाहेब पाटील,अनोरे सरपंच नामु पाटील,गारखेडा सरपंच भास्कर पाटील,बाभळ्याचे भानुदास पाटील,तरडे सरपंच अशोक पाटील,धानोरा सरपंच भगवान महाजन,,संतोष महाजन,दिपक पाटील,नंदकिशोर पाटील,भाऊसिंग सोनवणे, प्रमोद पाटील, चंदू भाटिया, नाना भालेराव, बाळू सपकाळे यांच्यासह परिसरातील सरपंच ,पदाधिकारी, शिवसेनेचे व युवासेनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या कामांचे झाले जल्लोषात भूमिपूजन व लोकार्पण

 

पष्टाने – गंगापुरी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे – 1 कोटी, बाभळे- धरणगाव रस्ता वरील लहान मुलाचे बांधकाम व डांबरीकरण करणे – 1 कोटी, धानोरा – धानोरा – गारखेडा रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करणे – 1 कोटी , धानोरा – पष्टाने रस्त्याचे डांबरीकरण 25 लक्ष तसेच धानोरा, गारखेडा, गंगापूरी येथिल गाव अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण , पेव्हिंग ब्लॉक बसविणे व इतर विकासांच्या कामांचे भूमिपूजनही सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच भगवान महाजन यांनी केले .बहारदार सूत्रसंचालन यांनी केले तर आभार अनोरे सरपंच नामु पाटील यांनी मानले.

Add Comment

Protected Content