मातंग समुदायाच्या सभागृहासाठी लहुजी संघर्ष सेनेचे आमदारांना निवेदन

पाचोरा, प्रतिनिधी । शहरात मातंग समुदायाच्या सभागृहासाठी लहुजी संघर्ष सेनेकडून आज आमदारांना  निवेदन देण्यात आले

या निवेदनात म्हटले आहे की , पाचोरा शहरामध्ये मातंग  समुदाय जास्त प्रमाणात असुनसुध्दा अद्याप कुठल्याही प्रकारचे सामाजिक , सांस्कृतीक व धार्मिक कार्यक्रमासाठी सभागृह नाही. लहुजी संघर्ष सेनातर्फे २८ सप्टेंबर २०१८  रोजी नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देवुन सभागृहाची मागणी केली आहे. अद्याप मागणी पुर्ण झालेली नाही.

दरवर्षी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती ऑगस्ट महिन्यात साजरी होते . पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे दुरवस्था होते. नगरपालिका हद्दीतील नगर परिषद मालकीची इमला जागा क्रं.२. ७५३९० पैकी असुन ही जागा देविदास चौधरी, श्रीराम नगर, यांच्या घराच्या बाजुला आहे. ह्या इमला जागेवर आमदार निधीतुन सभागृह बांधुन देण्यात यावे. अशी मागणी लहुजी संघर्ष सेनेतर्फे आमदार किशोर पाटील यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आज आमदार किशोर पाटील यांचे निवासस्थानी निवेदन देण्यात आले. यावेळी लहुजी संघर्ष सेनेचे ज्येष्ठ नेते मधुकर अहिरे, जिल्हा अध्यक्ष नाना भालेराव, जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) सुकदेव आव्हाड, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पवार, तालुकाध्यक्ष पांडुरंग अवघडे, महाराष्ट्र युवा अध्यक्ष स्वप्निल सपकाळे, शहर अध्यक्ष गोपाल अहिरे, अनिल आव्हाड, समाधान बोराडे, राजेंद्र चव्हाण, चेतन चव्हाण, सुभाष पगारे, ईश्वर अहिरे, किशोर बाविस्कर, प्रकाश कोतकर यांचेसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

नगरपालिका हद्दीतील कुठलाही भुखंड सभागृहासाठी देण्याचा अधिकार नगरपरिषदेला नसुन याबाबत आपण जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा करावा. शासन दरबारी या विषयी आपली भूमिका मांडली जाईल. असे आश्वासन यावेळी आमदार किशोर पाटील यांनी लहुजी संघर्ष सेनेच्या शिष्टमंडळास दिले.

 

Protected Content