बुलेट फिरविण्याच्या कारणावरून दोन जणांना मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कंडारी येथे घरासमोर बुलेट फिरविण्याच्या कारणावरून कुटुंबातील दोन जणांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना १४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी शनिवारी १६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील कंडारी गावात भिला इसा पटेल वय ४० हे आपल्या पत्नी अफसानाबी आणि मुलगा नजिम याच्या सोबत वास्तव्याला आहे. भिला पटेल यांनी जुन वापरती बुलेट १४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता घरी आणली होती. त्यावेळी त्याच्या मुलगा नजिम याने बुलेट फिरवत होता. या रागा आल्याने गावात राहणारे बाबु सुभान पटेल, वसीम बाबु पटेल, शाहरूख रहिम पटेल आणि अजिजा नाना पटेल या चौघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. मुलाला मारहाण करत असल्याचे पाहून अफसानाबी पटेल या आवरण्यासाठी गेल्या असता त्यांना देखील शिवीगाळ व मारहाण केली. या घटनेनंतर शनिवारी १६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता भिला पटेल यांनी धरणगाव पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे बाबु सुभान पटेल, वसीम बाबु पटेल, शाहरूख रहिम पटेल आणि अजिजा नाना पटेल चौघे रा. कंडारी ता. धरणगाव यांच्या विरोधात धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ खुशाल पाटील हे करीत आहे.

Protected Content