स्मार्ट कार्डचा उडाला बोजवारा ; ५ दिवसांपासून ग्रामिण भागातील विद्यार्थी ताटकळत (व्हिडिओ )

IMG 20190622 120843

जळगाव (प्रतिनिधी) कोणतीही पूर्वतयारी न करता राज्य सरकार घोषणा करते आणि त्यामुळे जनता मात्र समस्यांनी त्रस्त होते असाच अनुभव शालेय विद्यार्थ्यांकरिता स्मार्ट कार्ड पासेसच्या योजनेबाबत येतांना दिसत आहे . आज जळगाव शहर मध्यवर्ती बसस्थानकाला जळगाव काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी भेट देऊन गेल्या पाच दिवसापासून पासेससाठी रांगेत प्रतीक्षा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.  याप्रसंगी  शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी ज्ञानेश्वर कोळी , संदीप तेले , पी. पी. पाटिल ,सुभाष ठाकरे , कैलास पाटिल आदि उपस्थित होते.

ग्रामिण भागातील विद्यार्थी गेल्या ५-६ दिवसापासून दिवसभर ताटकळत फेऱ्या मारूनही पासेस मिळत नाहीत. कधी वीजपुरवठा बंद,कधी सर्वर बंद,एकच टेबलसेट मुळे काम पुढे सरकत नाही, कधी कर्मचाऱ्यांची दिरंगाई यामुळे ग्रामिण भागातील शालेय विद्यार्थी त्रस्त आहेत. आधीच दुष्काळ.शेतकऱ्यांच्या हाती पैसा नाही. दररोज भाड्याचे पैसे वाया जातात. भुकेले,तहानलेले लहान लहान मुले ५-६ दिवसापासून मेटाकुटीला आले आहेत. बस स्थानकांवर थांबून राहावे लागत असल्याने त्यांचे शालेय नुकसान होत आहे. आगारप्रमुख एस टी चे जळगाव आगार व्यवस्थापक  प्रज्ञान बोरसे , कनिष्ठ आगर निलेश पाटील , व निलीमा बागुल या अधिकाऱ्यांना  यांना त्रस्त विद्यार्थी व पालक यांच्यासहित भेटून त्यांनी या समस्या सोडवण्याची मागणी केली.  अन्यथा काँग्रेसतर्फे आंदोलन छेडले जाईल अशा इशारा त्यांनी दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री.गिरीश महाजन हे राज्यभर संकटमोचकाची भूमिका निभावतात .पण त्यांच्या जिल्ह्यातील विद्यार्थी अडचणींचा सामना करित असतांना ते जर दुर्लक्ष करतील तर जिल्ह्यासाठी काय कामाचे संकटमोचक ? त्यांनी याकडे लक्ष घालून खालील समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी डॉ राधेश्याम चौधरी यांनी केली आहे. तश्याप्रकारचा पाठपुरावा पालकमंत्री ,परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचेकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले .

या आहेत मागण्या
* स्मार्ट कार्ड पासेस प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त २ किंवा ३ टेबल सेट (खिडक्या )सुरु करावे.
* त्याठिकाणी संगणकावरिल ऑनलाईन काम विना अडथळा सुरु राहण्यासाठी इनव्हर्टरची व्यवस्था तातडीने करावी.)
* सर्वरशी संबंधित अडचणी तात्काळ सोडवाव्यात जेणेकरून सर्वर बंद असणार नाही .
* विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सकाळी ७ ते ९ अशा दोन शिप्टमध्ये कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी .
* वेटिंग मधील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी व पाण्याची जवळच्या बंद कैंटीनमध्ये व्यवस्था करून द्यावी.

 

 

Protected Content