जुन्या महामार्गाच्या नुतनीकरण संदर्भात शेतकऱ्यांचे आ.खडसेंना निवेदन

khadase

मुक्ताईनगर प्रतिनिधी । घोडसगाव-मलकापूर महामार्गात हतनूर धरणाचे बँक वॉटरमूळे महामार्गावर पाणी येत असल्याने नवीन महामार्ग तयार करण्यात आला. परंतू मुक्ताईनगर ते कुंड, घोडसगाव व कुऱ्हा परिसरातील गावात ये-जा करण्यासाठी 8 ते 10 कि.मी फेरा जनतेला सहन करावा लागतो आहे. म्हणून जुन्या महामार्गाचे नुतनीकरण डांबरीकरण करण्यासाठी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना निवेदन देण्यात आले आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, कोथळी-मुक्ताईनगर-जुने घोडसगाव-मलकापूर या जुन्या महामार्गाचे नुतनीकरण डांबरीकरण करुन जनतेची पायपीट टाळावी. अशा मागणीचे निवेदन हजारो शेतकऱ्यांनी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना दिले. सदर रस्त्यावरून संबंधित गावातील गावकरी शेतकरी नियमित वापर करत असून या रस्त्याचे नुतनीकरण करणे गरजेचे झाले आहे. हा रस्ता झाल्यास मुख्य हायवे वरील वर्दळ व वाढलेले अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच या रस्त्यावर असलेल्या शेतकरी बांधवांना सुद्धा फायदा होईल, असे निवेदनात नमुद केले आहे. तर यावेळी आ. एकनाथराव खडसे यांनी लवकरच सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल व या रस्त्यावर आवश्यक असलेल्या दोन पुलांच्या कामांसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.
निवेदनावर विलासभाऊ धायडे, दत्तू माळी, दयाराम जुमळे, काशिनाथ सावळे, संदीप जुमळे, भागवत जुमळे, भागवत धनगर, श्रीकृष्ण महाजन, गोविंदा चौधरी, विनोद माळी, बळीराम जुमळे, अशोक पाटील, रमेश महाजन, शमराव ताळले, सुरेश झांबरे, रामदास कठोके, संतोष डहाके, गजानन झांबरे,आणि इतर ग्रामस्थाच्या सह्या आहेत. तसेच यावेळी निवृत्तीभाऊ पाटील, राजुभाऊ माळी, विलासभाऊ धायडे, योगेश कोलते उपस्थित होते.

Protected Content