वरणगाव येथे शांतता कमिटीची बैठक; गणेश मंडळांना केले मार्गदर्शन (व्हिडीओ)

वरणगाव दत्तात्रय गुरव । आगामी काळात येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाच्या अध्यक्षांची आणि पोलीस प्रशासनाची वरणगाव पोलीस स्टेशनच्या हॉलमध्ये अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या  अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. 

कोरोना कालावधीमध्ये कोणत्याही गणेश मंडळाकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे आव्हान हे चंद्रकांत गवळी यांनी केले आहे..वरणगाव शहराची पन्नास हजाराच्या आसपास लोकसंख्या असून शहरातील २० गणेश मंडळांनी वरणगाव पोलीस स्टेशनकडे रीतसर परवानगी मागितली आहे. या सर्व मंडळाच्या अध्यक्षांचा समवेत आज वरणगाव पोलीस स्टेशन येथील सभामंडपामध्ये जिल्हा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी चंद्रकांत गवळी यांनी प्रशासनाच्या वतीने घालून दिलेल्या नियमांचे माहिती गणेश मंडळाच्या अध्यक्षांना दिली. कोरोना कालावधीमध्ये कोणत्याही गणेश मंडळाकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे आव्हान हे चंद्रकांत गवळी यांनी केले आहे

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!