काश्मिरी पंडितांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन ; पुण्यात मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | केंद्रात भाजपच्या सत्तेला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहे. पण त्याच दरम्यान जम्मू-काश्मीरमधील पंडितांवर पुन्हा एकदा हल्ले सुरू असून आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. याच्या निषेधार्थ पुण्यात मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.

गेल्या काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने ३७० कलम हटवून जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेश जाहीर केला. काही दिवस वातावरण शांत होते. परंतु जम्मू-काश्मीर मध्ये पुन्हा येथील पंडितांवर हल्ले सुरू झाले आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तेथील नागरिकांना संरक्षण द्यायचे सोडून केंद्र सरकार केवळ वाचळवीरांना संरक्षण देत बसले आहे. तसेच केंद्रातील सत्तेला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाकडून विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहे. ही बाब निषेधार्ह असून घटना रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याची टीका शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय यांनी केली आहे. यावेळी शिवसेनेतर्फे आंदोलन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

Protected Content