फोंडा येथे अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन – प्रशांत जुवेकर(व्हिडिओ )

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोवा राज्यातील फोंडा येथे दि.१२ ते १८ जून रोजी दहाव्या अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनात उत्तर महाराष्ट्रातील १२ संघटनांचे ३० हुन अधिक प्रतिनिधी आमंत्रित आहे. गोवा येथे गेल्या १० वर्षांपासून होणाऱ्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे देशात हिंदु राष्ट्राची चर्चा प्रारंभ झाली. या दहाव्या अधिवेशनात हिंदु राष्ट्राची कार्यपद्धती रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘हिंदु राष्ट्रात आदर्श राजव्यवहार कसा असावा ?’, याविषयी दिशादर्शन करण्यासाठी यंदाच्या अधिवेशनामध्ये ‘हिंदु राष्ट्र संसदे’चे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनातील तीन दिवस ‘हिंदु राष्ट्र संसद’ घेतली जाणार असल्याची माहिती दिली. याप्रसंगी सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे आणि हिंदू राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. मोहन तिवारी हे उपस्थित होते.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.