जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकाजवळील लाडवंजारी मंगल कार्यालयाच्या जवळील रामद्वारा (जगतपाल) येथे आज, रविवार ६ जुलै पासून ७ सप्टेंबर पर्यंत विशेष अखंड नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची सुरुवात आज सकाळी ७ वाजता गुरुमहिमा आणि पदगायनाने झाली, त्यानंतर रामनामाचा अखंड जप सुरू करण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने रामस्नेही भाविकांनी सहभागी होऊन रामनामाचा जप केला. हा नामस्मरण सोहळा रामद्वारा सिव्हिल हॉस्पिटल आणि रामद्वारा कांचन नगर येथेही आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात जगतपाल चांडक गुरुजी, डॉ. अनमोल चांडक यांच्यासह अनेक मान्यवर रामस्नेही कार्यकर्ते उपस्थित होते. हा कार्यक्रम ७ सप्टेंबर पर्यंत अविरत सुरू राहणार आहे. आयोजकांतर्फे राज सूर्यवंशी यांनी जळगाव शहरातील जास्तीत जास्त भाविकांनी दररोज किमान दोन तास रामनामाचा जप करून स्वतःच्या जीवनाच्या कल्याणार्थ या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.