जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खेडी पेट्रोल पंपाजवळ दोन भावांना मारहाण करत खिश्यातील ५ हजार रूपये काढून जबरी लुट केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार १० मार्च रोजी रात्री १२.३० वाजता घडला. याप्रकरणी सोमवारी ११ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील रायपूर येथे निलेश रामलाल शिलाले आणि त्याचा भाऊ शिवा रामालाल शिलाले हे वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवार १० मार्च रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास निलेश आणि शिवा हे दोन्ही भाऊ घरी जाण्यासाठी निघाले असता, खेडी पेट्रोलपंपाजवळ एका रिक्षात आलेल्या दोनजणांनी त्यांचा रस्ता आडविला. दोन्ही भावांना मारहाण करत त्यांच्या जवळील ५ हजार रूपयांची रोकड लांबविली. हा प्रकार घडल्यानंतर दोन्ही भावांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवार ११ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.