बेपत्ता बालिकेचा आढळला मृतदेह

अमळनेर प्रतिनिधी | येथून बेपत्ता झालेल्या पाच वर्षांच्या बालिकेचा मृतदेह बोरी नदीपात्रातील डोहात तरंगतांना आढळून आला आहे.

याबाबत वृत्त असे की, येथील कुरेशी मोहल्ल्यातील जोया शेख तैय्यब कुरेशी ही पाच वर्षांची बालिका २३ नोव्हेंबरपासून बेपत्ता झाली होती. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही तिचा तपास न लागल्याने अमळनेर पोलिसांत हरवल्याची नोंद केली होती. यानंतर बोरी नदीपात्रातील डोहात तिचा मृतदेह तरंगताना दिसला. नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणला.
घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र दिवे, पोलिस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील आणि मिलिंद भामरे यांनी भेट दिली. दरम्यान, या संदर्भात मयत बालिकेच्या कुटुंबियांनी एका तरूणावर संशय व्यक्त केला असून त्याची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!