दुचाकीची चोरीतील फरार संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जोशी वाडा परिसरातून दुचाकी लांबविणाऱ्या संशयित आरोपीला नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथून एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली असून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान अयोद्दिन पिंजारी वय ३३ रा. अनरद जि. नंदूरबार असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप भागवत कोळी वय ४३ रा. जोशी वाडा, जळगाव यांची दुचाकी चोरी केल्याप्रकरणी ८ मार्च २०२३ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आला होता. तेव्हापासून संशयित आरोपी इमरान अयोद्दिन पिंजारी हा फरार झालेला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गुन्हे शेाध पथकाला मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी चोर इमरान पिंजारी हा नंदूबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार एमआयडीसी पोलीसांनी रविवारी १० मार्च रोजी दुपारी ४ वाजता त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली.

ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाडे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पो.ना. विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, छगन तायडे यांनी केली. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहे.

Protected Content