Home क्राईम विषारी औषध घेतलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

विषारी औषध घेतलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

0
107

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचपूरा येथे राहणाऱ्या ४० वर्षीय तरुणाने शेतात विषारी औषध घेतल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गजानन मन्साराम पाटील वय-४० रा. चिंचपूरा ता.धरणगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, गजानन पाटील हा तरुण धरणगाव तालुक्यातील चिंचपूरा गावात आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. २७ फेब्रुवारी रोजी तो शेतात असताना त्याने विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्याला उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना शनिवार ९ मार्च रोजी मध्यरात्री २ वाजता मृत्यू झाला. या घटनेबाबत रविवारी १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी हे करीत आहे.


Protected Content

Play sound