जळगाव भुसावळ रोडवरील अपघातप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव भुसावळ रोडवर हॉटेल साई समोर दोनदुचाकींच्या धडकेत एका दुचाकीवरील मागे असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी घडली होती. या अपघातप्रकरणी बुधवार, १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील जामनेर रोड परिसरातील साईदत्त नगरात कोमल धनसिंग पाटील हे वास्तव्यास आहेत, ते २९ ऑगस्ट रोजी रात्री त्यांचे मित्रासोबत एम.एच. १२ व्ही ए ३४०२ या क्रमाकांच्या दुचाकीने जळगाव भुसावळ रोडने जात होते, यादरम्यान राँग साईडने येणाऱ्या एका (एमएच १९ डीयू ३३३८) या क्रमाकांच्या दुचाकीने कोमल पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, यात कोमल पाटील व त्यांचा मित्र ह्या दोघांना दुखापत होवून ते जखमी झाले, तर दुसऱ्या दुचाकीवरील दुचाकीस्वार सुध्दा जखमी झाला, तर दुचाकीवर मागे बसलेल्या विजय भिका शिरसाठ यांना गंभीर दुखापत होवून मृत्यू झाला, या अपघातात दोघांच्या दुचाकींचेही नुकसान झाले आहे. या अपघातप्रकरणी १५ दिवसानंतर बुधवारी कोमल पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन (एमएच १९ डीयू ३३३८) या क्रमाकांच्या दुचाकीवरील चालक योगेश गणेश राणे वय ३४ रा विठ्ठलपेठ याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहेत.

Protected Content