महिलेसह तिघांवर प्राणघातक हल्ला : गुन्हा दाखल

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कर्जोद येथील विवाहित महिलेसह तिघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

रावेर तालुक्यातील कर्जोद येथे एकाने महिलेसह तिघांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कर्जोद येथील विवाहिता पूनम विलास ससाणे या घरात एकट्या असतांना अनिल रमेश ससाणे याने तिच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. यामुळे विवाहितेने त्याला जाब विचारून शिवीगाळ केली. त्याचा राग आल्याने अनिलने केळी कापण्याच्या बख्खीने पूनमवर वार केले. तिची सासू रमाबाई ससाणे यांनी प्रतिकार केल्यावर अनिलने तिच्यावरही वार केला. तर गावातीलच गौतम गिरधर ससाणे हा याने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावरही वार करण्यात आला. तर पूनमच्या दिराणीलाही धमकावण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी घडली.

दरम्यान, या प्राणघातक हल्लयात तीन जण जखमी झाले असून यातील महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला जळगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रावेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: