दुचाकींची समोरा-समोर धडक : तिघांचा मृत्यू !

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दोन मोटारसायकलींच्या समोरा-समोर झालेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंजीर जखमी झाला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, तालुक्यातील देऊळगाव गुजरी ते धामणगाव बडे या गावांच्या दरम्यान रात्री सुमारे नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात समोरा-समोरून येणार्‍या दोन मोटारसायकलींची धडक झाली. या अपघातामध्ये देऊळगाव गुजरी येथील प्रवीण नामदेव माळी ( वय४५) आणि त्यांचा मुलगा अतुल प्रवीण माळी ( वय १७) हे एका दुचाकीवरील बाप-लेक जागीच ठार झालेत. तर दुसर्‍या दुचाकीवर असणारा विलास भगवान गव्हाळ (वय २८, रा. खेडी पन्हेरी, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा ) हा युवक देखील ठार झाला. तर देऊळगाव गुजरी येथील खालीद जमशेद तडवी हे यात जखमी झाले आहेत.

हा अपघात घडल्याची माहिती मिळाल्यानंतर देऊळगाव गुजरीसह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पहूर पोलीस स्थानकाचे निरिक्षक प्रतापराव इंगळे यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले. तर या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या खालीद तडवी यांना उपचारासाठी जळगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या भीषण अपघतातात माळी पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याने देऊळगाव गुजरी परिसरावर शोककळा पसरली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: