Home आरोग्य जळगाव जिल्ह्यात फक्त तीन कोरोना बाधीत रूग्ण

जळगाव जिल्ह्यात फक्त तीन कोरोना बाधीत रूग्ण

0
112


जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येतील घट कायम राहिली असून गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात फक्त तीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणात गती आलेली आहे. यातच प्रशासकीय उपाययोजनांमुळे कोरोनाच्या रूग्णांची संख्या ही बर्‍यापैकी आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात फक्त तीन कोरोना बाधीत आढळून आले आहेत. हे बाधीत रूग्ण जळगाव शहर, भुसावळ आणि चोपडा तालुक्यांमध्ये आढळून आले आहेत. तर उर्वरित १३ तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासांमध्ये एकही पेशंट आढळून आला नाही. तर गेल्या चोवीस तासांमध्येच चार रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


Protected Content

Play sound