गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनात अनसंग हिरोज ऑफ दि फ्रिडम स्ट्रगलविषयवार मार्गदर्शन

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात यंत्र विभागातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत अनसंग हिरोज ऑफ दि फ्रिडम स्ट्रगल या विषयावर शुक्रवार दि.२७ मे रोजी मार्गदर्शन करण्यात आले.

 

कार्यक्रमाला प्रमुख वक्ते लेप्टनंट कर्नल पवनकुमार हे उपस्थित होते.सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार, अधिष्ठाता प्रा. हेमंत इंगळे, ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट ऑफीसर डॉ.विजयकुमार वानखेडे, यंत्र विभाग प्रमुख प्रा. तुषार कोळी तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला लेप्टनंट कर्नल पवन कुमार यांचे महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार यांनी पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. तसेच नंतर यंत्र विभाग प्रमुख प्रा. तुषार कोळी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. लेप्टनंट कर्नल पवन कुमार यांनी जम्मु काश्मीर, नॉर्थ ईस्ट व राजस्थान या विभागांमध्ये २२ वर्ष सेवा केली. तसेच त्यांनी आमबिस वर्कशॉपमध्ये ट्रेनिंग दिलेले आहे. त्याचप्रमाणे बॉर्डर ऑर्गनायइ शन कारगील मध्ये काम केले आहे. सध्या पवन कुमार हे जळगाव याठिकाणी कार्यरत आहेत.लेप्टनंट कर्नल पवन कुमार यांनी विद्यार्थ्यांना पारतंत्र्यातून स्वातंत्र्यापर्यतचा प्रवास कथन केला. स्वातंत्र्यासाठी अनमोल कष्ट केलेल्या हुतात्मांचा पराक्रम विषद केला. तसेच भारतीय जनतेने स्वातंत्र्याची जाण व किंमत राखणे महत्वाचे आहे, व त्यापद्धतीने हे स्वातंत्र कायम राहण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे असे त्यांनी नमुद केले. इंजिनियरिंग शिक्षण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी आर्मी, नेव्ही व एअरफोर्स या सारखे पर्याय उपलब्ध आहेत. पण तिथे प्रवेश मिळविण्यासाठी प्रयलांची पराकाष्ठा करणे व तश्या प्रकारचा अभ्यास व शिस्त अंगीकारणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधतांना विद्यार्थ्यांचा कल जाणुन घेतला तसेच प्रश्नावलीच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान किती गरजेचे आहे हे पटवून दिले. विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमात उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.योगेश वंजारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. व कार्यक्रमाचे सत्र संचालन काजल विश्वकर्मा (व्दितीय यंत्र ) या विद्यार्थीनीने केले.

Protected Content