डॉ.उल्हास पाटील फिजीयोथेरपी महाविद्यालयात राष्ट्रीय जेष्ठ आरोग्य व फिटनेस दिन उत्साहात

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | डॉ.उल्हास पाटील फिजीयोथेरपी महाविद्यालयात २६ मे राष्ट्रीय जेष्ठ आरोग्य व फिटनेस दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील यांनी कौतुक करत अभिनंदन केले.

 

कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी डॉ. उल्हास पाटील फिजीयोथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, डॉ.उल्हास पाटील रूग्णालयाच्या रक्‍तपेढीचे डॉ. नितीन भारंबे, डॉ. भवानी राणा,डॉ. पुनम देवी यासह जेष्ठ नागरिक उपस्थीत होते. डॉ. अंकिता, डॉ. निखील पाटील, डॉ. प्रज्ञा महाजन, डॉ. श्रुती यांच्या मार्गदर्शनानुसार ४५ जेष्ठ नागरिकांवर विविध प्रकारचे व्यायाम व प्रात्याक्षिक व्दारे उपचार प्रशिक्षण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. पुनम देवी यांनी उतारवयातील दुखणे व घ्यावयाची काळजी या विषयावर तर प्राचार्य डॉ. नागुलकर यांनी उतारवयात अपघात झाल्यास जेष्ठ नागरिकांनी उच्च प्रशिक्षीत फिजीओथेरेपीस्टच्या मदतीने व्यायाम व उपचार घ्यावे असे सांगत घरगुती उपचार पध्दतीचा उपयोग धोकादायक ठरू शकतो असे स्पष्ट केले. प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी, भारती चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content