दुचाकीची चोरी करून बनावट नंबर लावून फिरणाऱ्या दोघांना अटक; एलसीबीची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीची चोरी करून बनावट नंबर लावून फिरणाऱ्या दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी १ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मेस्कोमाता नगर परिसरातून अटक केली आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपीचे पहिले आणि आडनाव सारखे असल्याचे समोर आले आहे. पुढील कारवाईसाठी दोन्ही चोरट्यांना पुढील कारवाईसाठी शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मेरा भाई उर्फ राहूल रविंद्र कोळी वय-२२ आणि पप्पु उर्फ राहूल रामदास कोळी वय २८ दोन्ही रा. मेस्कोमाता नगर, जळगाव असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार माहिती अशी की, जळगाव शहरातील मेस्को माता नगरात दोन जण हे चोरी दुचाकी घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला दोघांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने सोमवारी १ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता रोजी कारवाई करत मेरा भाई उर्फ राहूल रविंद्र कोळी याला मेस्कोमाता नगरातून अटक केली. त्यांच्याजवळ चोरीची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएच ७७८९) आढळून आली. पोलीसांनी चौकशी केल्यानंतर त्याने ही दुचाकी साथीदार पप्पु उर्फ रविंद्र रामदास कोळी याच्या सोबत चोरी केल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्याला देखील ताब्यात घेतले. चौकशीत दुचाकीवरील क्रमांक हा बनावट असल्याची कबुली दिली असून ही दुचाकी शनीपेठ पोलीस ठाण्यात चार वर्षांपुर्वी दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. पुढील कारवाईसाठी दोन्ही संशयित आरोपींना शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ..

यांनी केली ही कारवाई
पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावीत, एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल मोरे, पोउनि गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार अनिल जाधव, पोहेकॉ महेश महाजन, नंदलाल पाटील, हेमंत पाटील, बबन पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, मोतीलाल चौधरी यांनी केली.

Protected Content