किरकोळ कारणावरून कुटुंबातील तिघांना मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील कवठळ गावात किरकोळ कारणावरून कुटुंबातील तिघांना दारूच्या नशेत येवून दोज जणांनी लाथाबुक्क्यांनी व कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी २ जुलै रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी ३ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेंद्र चाराचंद पाटील वय ४५ हे आपल्या पत्नी संजना व मुलगी सौजन्या यांच्यासह धरणगाव तालुक्यातील कवठळ येथे वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांच्या शेजारी राहणारा भावाला भिंतीवरील लोखंडी अँगल काढून घेण्याचे सांगितले. या रागातून बुधवारी २ जुलै रोजी रात्री ८ वाजता त्यांचा भाऊ जितेंद्र तारांचद पाअील आणि पुतण्या सौरभ जितेंद्र पाटील दोन्ही रा. कवठळ ता.धरणगाव यांनी महेंद्र पाटील, त्यांची पत्नी संजना आणि मुलगी सौजन्या पाटील यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुतण्या सौरभ याने लोखंडीच्या दांडक्याने महेंद्र पाटील यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखातप करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जितेंद्र पाटील व सौरभ पाटील या दोघांवर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील हे करीत आहे.