भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हनुमान नगरातील एका भागात राहणाऱ्या ३३ वर्षीय विवाहितेला तिच्या मुलांना मारण्याची धमकी देत भुसावळ शहरातील सुरभी लॉज येथे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी ९ मे रोजी दुपारी ४ वाजता उघडकिला आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील हनुमान नगरातील एका भागात ३३ वर्षीय महिलाही आपल्या मुलांसह वास्तव्याला आहे. १२ फेब्रुवारी ते १२ मार्च दरम्यान महिलेला तिच्या मुलांना रेल्वे पटरीवर फेकून जीवेठार मारण्याची धमकी देऊन संशयित आरोपी विनोद इंगळे रा.उचंदा ता. मुक्ताईनगर याने महिलेवर भुसावळ शहरातील सुरभी लॉज आणि खडका चौफुली येथे वेळोवेळी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान हा त्रास सहन झाल्याने महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुरुवारी ९ मे रोजी दुपारी ४ वाजता संशयित आरोपी विनोदी इंगळे रा. उचंदा ता. मुक्ताईनगर यांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे.