किनगाव येथे मजुराची आत्महत्या

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे एका मजुराने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन या बाबत यावल पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी किनगाव बुद्रुक येथे राहणारे संतोष एकनाथ साळुंके (वय ४५ वर्ष) या मजुरी करणार्‍या व्यक्तिने आज दिनांक १७ जुन रोजी सकाळी ११ते १ वाजेच्या दरम्यान किनगाव गावातील चुंचाळे गावाच्या रस्त्यावर असलेल्या आपत्या घराच्या छताला असलेल्या पंख्यास दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयत संतोष सांळुके हा आपल्या कुटुंबासह राहात होता. दरम्यान मागील सुमारे २० दिवसांपासून त्याची पत्नी ही आपल्या दोन मुलींना घेवुन धानोरा गावी असणार्‍या माहेरी गेली असल्याने संतोष साळुंके हा एकटाच राहात होता. आज सकाळी उशीरा पर्यंत तो घरातुन बाहेर न आल्याने वाड्यातील लोकांनी घराचा दरवाजा तोडुन उघडल्यावर ही घटना समोर आली.

ही माहिती मिळताच पोलीस कर्मचारी सुनिल तायडे, विकास सोनवणे व गृहरक्षक दलाचे सद्दाम खाटीक यांनी पंचनामा केला आहे. मयत संतोष साळुंके याच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रल्हाद पवार यांनी केले.

Protected Content