गणेश कॉलनीत दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडले; दुसरा गंभीर

जळगाव प्रतिनिधी । मित्रासोबत शहरात येत असतांना दुचाकी घसरल्याने पडलेल्या तरूणाच्या अंगावर ट्रक गेल्याने दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाल्याची घटना दुपारी २ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनीतील गोकुळ स्वीट मार्टजवळ घडली. तर दुसरा तरूण गंभीर जखमी झाला आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तरूणाच्या नातेवाईकांनी आक्रोश केला होता.

सौरभ बनवारीलाल तिवारी (वय-२२) रा. महाविर नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर लिलाधर संजय काळे रा. कांचन नगर जळगाव हा तरूण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, सौरभ तिवारी यांचे गांधी मार्केटमध्ये शुज चे दुकान आहे. शहरातील महाविर नगरात आई, बहिण व लहान भावासोबत राहतो. शुज दुकान चालवून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. आज दुपारी २ वाजेच्या सुमारास चुलत भावाला दुकानावर बसवून मु.जे. महाविद्यालय परिसारात जातो असे सांगून जिवलग मित्र लिलाधर संजय काळे रा. कांचन नगर यासोबत दुचाकीने गेले. काम आटोपून ते दुकानवर येण्यासाठी गणेश कॉलनीतील गोकूळ स्वीटमार्ट समोरून जात असतांना दुचाकी घसरली. तेवढ्यात मागून भरधाव ट्रकने धडक दिली. ट्रक चाकाखाली सौरभ आल्याने जागीच मृत्यू झाला तर लिलाधर काळे हा गंभीर जखमी झाला आहे. अपघात झाल्यानंतर ट्रक जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला.अपघाताची  कळताच नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. मुलाचा मृतदेह पाहून सौरभच्या आईने हंबरडा फोडला होता.

Protected Content