फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीचा विनयभंग

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथे राहणाऱ्या एका महिलेला तिच्या मुलीचे फोटो व्हायरल करण्याची अश्लील शिवीगाळ करत धमकी देवून विनयभंग केल्याची घटना सोमवारी २० मे रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ मे रोजी दुपारी २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील एका भागात ३३ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्याच गावात मिलींद शरद महाले याने महिलेच्या मुलीला फोन करून सांगितले की, माझ्याकडे माझे आणि तुझे फोटो माझ्या मोबाईलमध्ये आहे. ते मी व्हायरल करेल अशी धमकी दिली. पुन्हा त्याने गावातील इतर दोन जणांना मोबाईलवरून फोन करून मुलीला पुन्हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून अश्लिल शिवीगाळ करत विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने मारवड पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी मिलींद शरद महाले याच्या विरोधात मारवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करीत आहे.

Protected Content