धक्कादायक : मुलाच्या वाढदिवशी तरुणाने राहत्या घरात घेतला टोकाचा निर्णय… नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील गणेश नगरात राहणाऱ्या एका तरुण व्यापाराने नैराश्यातून आईच्या घरी जाऊन पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी ९ मे रोजी दुपारी १ वाजता उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी तरुणाच्या ३ वर्षीय मुलाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याच्या घरी कार्यक्रमाची तयारी असताना दुसरीकडे आईच्या घरी जाऊन पित्याने गळफास लावून घेतला. या घटनेमुळे नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. अमित नंदलाल कटारिया (वय ३२, रा. आदर्श नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमिततो दोन महिन्यांपूर्वीच आदर्श नगरात पत्नी, तीन वर्षाचा मुलगा सन्मित यांच्यासह राहायला आला होता. महात्मा फुले मार्केट येथे ‘चुनरी कलेक्शन’ नावाने त्याचे कपड्याचे दुकान आहे. त्यातूनच तो परिवाराचा उदरनिर्वाह करतो. गुरुवारी ९ मे रोजी त्याचा मुलगा सन्मित याचा वाढदिवस होता. दुपारी १ वाजता तो त्याच्या आई, वडिलांच्या घरी गणेश नगरात भेटायला गेला होता. तेथे तो वरच्या खोलीत गेला. तासभर झाला तरी मुलगा खाली आला नाही, म्हणून अमित यांच्या आईने त्याला फोन लावला. पण त्याने उचलला नाही. दरवाजाजवळ आवाज दिला पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आईने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला, तेव्हा समोर मुलगा अमित पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

यावेळी आईने एकच हंबरडा फोडला. आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी तपासून अमितला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. यावेळी व्यापारी बांधव देखील रुग्णालयात आले होते. दरम्यान, अमित कटारिया याने आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content