मुंबई-पुर्ण महामार्गावर ब्रेक निकामी झाल्याने ट्रकची दोन वाहनांना धडक; तीन ठार, आठ जखमी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई-पुणे महामार्गावर एका ट्रकने समोर असलेल्या टेम्पो आणि कारला धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. हा अपघात खोपोलीजवळ घडला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला, या अपघात कारमधील दोघांचा आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ट्रकचा ब्रेक निकामी झाल्यानं चालकाचं ट्रकवरचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने पुढे असलेल्या कोंबड्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि एका ओमीनी कारला धडक दिली. ट्रकने दिलेल्या धडकेनं भीषण अपघात झाला. ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, ओमनी कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, ओमनीमधील तीन जण जखमी झाले आहेत. तर या अपघातात ब्रेक फेल झालेल्या ट्रकच्या चालकाचाही मृत्यू झाला आहे. तसेच, ट्रकमधील 2 जण जखमी झाले आहेत. ट्रकची धडक ज्या टेम्पोला बसली, त्यातील 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. असे अपघातात एकूण 8 जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तत्काळ रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

Protected Content