Home Cities जळगाव पोळा सणाला बैलांची मिरवणूक न काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पोळा सणाला बैलांची मिरवणूक न काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

0
51

जळगाव, प्रतिनिधी । पोळा या सणाच्या निमित्ताने नागरिकांनी बैल पूजा घरीच करावी, बैलांची मिरवणूक काढण्यात येवू नये, सार्वजनिक प्रसादाचे वाटप करण्यात येवू नये, तसेच कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

दिनांक 4 ऑगस्ट, 2020 रोजीच्या आदेशान्वये सर्व प्रकारचे राजकीय सामाजिक/ सांस्कृतिक/ शैक्षणिक/धार्मिक कार्यक्रम व इतर मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारे सर्व कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

शासन परिपत्रक 17 जुलै, 2020 नुसार सर्व जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. तरी नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावीत याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर श्री. राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण यांनी याप्रमाणे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound