विश्वविजेत्या भारतीय संघाने घेतली पंतप्रधानांची भेट

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय संघ पंतप्रधानांच्या ७, लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी पोहोचला होता. बार्बाडोसहून परतल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच भेट होती. ही बैठक बराच काळ चालली. भारतीय संघ बार्बाडोसहून आज म्हणजेच गुरुवारी (४ जुलै) सकाळी ६ वाजता दिल्लीला पोहोचला. दिल्लीला पोहोचल्यानंतर रोहित आणि कंपनीने आयटीसी मौर्या हॉटेल गाठले आणि तेथे काही काळ थांबून नरेंद्र मोदी यांची भेट मुंबईकडे रवाना झाली.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ आज सकाळी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यानंतर टीम इंडियाचे खेळाडू नवी दिल्लीतील आलिशान हॉटेल मौर्यामध्ये थांबले. याआधी टीम इंडियाचे दिल्ली विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. मात्र, हॉटेल मौर्यामध्ये भारतीय खेळाडूंसाठी खास नाश्ता तयार करण्यात आला होता. हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी टीम इंडियाला छोले-भटूरे आणि लस्सी मिळाली. विराट कोहलीसोबतच टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना छोले भटुरे आवडतात.

हॉटेल मौर्या येथे भारतीय खेळाडूंसाठी छोले भटुरे, लस्सी आणि त्यांच्या आवडीचा नाश्ता तयार करण्यात आला होता. खरंतर विराट कोहलीला छोले-भटुरा आणि लस्सी खूप आवडतात. याशिवाय इतर खेळाडूंच्या आवडीनुसार नाश्ता तयार करण्यात आला होता. दरम्यान, बार्बाडोस ते मुंबई अशा १६ तासांच्या थकवणाऱ्या प्रवासानंतर टीम इंडिया दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळवार दाखल झाली. येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आज मुंबईत संध्याकाळी ५ वाजता चॅम्पियन संघाचा खुल्या बसमधून मरिन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत रोड शो होणार आहे.

Protected Content