ममता बॅनर्जींचा भाचा अभिषेक बॅनर्जींवर सीबीआयची वक्रदृष्टी

 

कोलकाता : वृत्तसंस्था । सीबीआयच्या   रडारावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी आहे. कोल स्मगलिंग प्रकरणी चौकशी करण्यासाठी सीबाआयची टीम अभिषेक बॅनर्जींच्या घरी धडकली आहे.

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलेलं आहे. भाजपा व तृणमूल काँग्रेसमधील राजकीय वाद शिगेला पोहचल्याचं दिसत  आहे    अभिषेक बॅनर्जींची पत्नी व ममता बॅनर्जींची सून रूजीरी बॅनर्जी यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. याचबरोबर सीबीआयकडून अभिषेक बॅनर्जींना समन्स देखील जारी करण्यात आलं आहे, त्यानुसार त्यांना २४ तासांच्या आथ चौकशीसाठी हजर होण्यास सांगण्यात आलेलं आहे.

 

सीबीआयने रुजीरा बॅनर्जी यांनी कोळासा तस्करी चौकशीप्रकरणी नोटीस दिली होती. त्यानुसार तपासासाठी  तीन अधिकाऱ्यांची टीम त्यांची चौकशी करत आहे. असं पहिल्यांदाच घडले आहे की सीबीआयने कोळसा तस्करी चौकशीसाठी तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जींना समन्स जारी केलं आहे.

 

या अगोदर देखील सीबीआयने अभिषेक बॅनर्जींच्या अनेक निकटवर्तींविरोधात छापेमारी केली आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी कोलकातामध्ये तृणमूल यूथ काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी विनय मिश्राच्या ठिकाणांवर देखील छापेमारी करण्यात आली होती.

Protected Content